Type Here to Get Search Results !

भाजपाच्या श्रीकांत देशमुख यांची आज पोलिस ठाण्यात हजेरी

 


पुणेदि.२६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): लग्‍नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल असून, तो सदर बझार पोलिस ठाण्याकडे वर्ग झाला आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. यात अंतरिम जामीन मंजूर करीत देशमुख यांना तपासासाठी आजपासून (दि. २६) दोन दिवस पोलिस ठाण्यात हजेरी देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी हे आदेश दिले आहेत.

मुंबई येथील एका महिलेने अर्जदार श्रीकांत देशमुख यांनी त्यांना लग्‍नाचे आमिष दाखवून मुंबई, सोलापूर, पुणे, सांगली आदी ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. मात्र, लग्‍न केले नाही, अशा आशयाची फिर्याद संबंधित महिलेने प्रथमत: पुणे येथील डेक्‍कन जिमखाना पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार हा गुन्हा सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे. याप्रकरणी पोलीस श्रीकांत देशमुख यांना अटक करण्याच्या मागावर होते. त्यामुळे देशमुख यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायाधीश शिरभाते यांनी श्रीकांत देशमुख यांना अटक न करण्याचे आदेश दिले. मात्र तपासासाठी पोलीस ठाण्यात २६ आणि २७ जुलै रोजी हजेरी देण्याचे आदेश दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी २८ जुलै रोजी होणार आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.