Type Here to Get Search Results !

'बाई, बुब्स आणि ब्रा' म्हणजे माझ्या आयुष्यातला 'तमाशा Live', हेमांगीच्या नव्या पोस्टची चर्चा.

 


पुणेदि.१ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): 'बाई, बुब्स आणि ब्रा' ही खळबळ माजवणारी, चर्चेला ऊत आणणारी पोस्ट अभिनेत्री हेमांगी कवीनं शेअर केली. हेमांगीच्या या पोस्टवरून चर्चा झाली, वादही झाले. प्रचंड व्हायरल झालेली ही पोस्ट हेमांगीनं वर्षभरापूर्वी शेअर केली होती. या पोस्टला एक वर्ष होऊन गेलं असलं तरी हेमांगी मागे हटली नाही. यानिमित्तानं तिनं 'माझ्या आयुष्यातला 'तमाशा Live' म्हणत आणखी एक पोस्ट शेअर केलीय.

हेमांगीनं तिच्या 'बाई, बुब्स आणि ब्रा' पोस्टबद्दल लिहिलं आहे. तिला पाठिंबा देणारेही होते आणि तिच्यावर टीका करणारेही होते. लोक आजही या पोस्टवरून हेमांगीची खिल्ली उडवतात. पण ती नेहमीच सडेतोड उत्तर देते.काही लोक आजही त्याची खिल्ली उडवत मला आठवण करून देतायेत. टॅग करतायेत. ते खिल्ली उडवणारंच कारण त्यांना त्यातलं गांभीर्य कळलं नाही आणि ते कधी कळणार ही नाही किंवा त्यांना मुद्दाम कळून घ्यायचं नाही. 

पण अनेक लोक या ट्रोलर्स एवढेच किंबहुना जास्तच म्हणेन मी खूप संवेदनशील लोक माझ्या सपोर्टला आले आणि माझ्याशी जोडले गेले. खूप मुलींच्या, स्त्रियांच्या मनातल्या कुचंबनेला वाच्या फुटली. माझ्यासाठी हेच महत्वाचं होतं कारण माझा हेतूच तो होता. काही तरी वादग्रस्त, सेन्सेशनल बोलून मला कुठलीही पब्लिसिटी स्टंटवगैरे करायचा नव्हता. मला माझ्या देशानं व्यक्त व्हायचा अधिकारी दिलाय आणि मला ज्या गोष्टीचा समाजात वावरताना जर त्रास होत असेल तर तो मी बोलून दाखवणार. तसाच व्यक्त व्हायचा अधिकार काही ट्रोलर्सनं घेतला आणि वाट्टेल ते थराला जाऊन ट्रोल केलं. अजूनही करतात.

हेमांगीनं तिच्या इन्स्टाग्रावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात ती गोल पोळ्या कशा बनवाव्या हे दाखवतेय. मात्र यात तिनं घातलेल्या कपड्यांवरून तिचा प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अंतर्वस्त्रावरुन तिला टोमणे मारण्यात आले. तिला बरं वाईट बोलण्यात आलं. या सर्व ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत, तिनं इन्स्टाग्रावर स्टोरी पोस्ट केली आणि ट्रोलर्सना झापलं होतं. त्यानंतर तिनं फेसबुकवर याबद्दल लिहिलं होतं.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.