Type Here to Get Search Results !

बापरे... पुणे बनत आहे तस्करीचे केंद्र; पूर्ण प्रकरण वाचाल तर अवाक व्हाल

 


पुणे दि. 0  जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : अवैध दारू व अंमलपदार्थ वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली. हडपसर पोलिसांनी जून २०२२ मध्ये सात कारवाईमध्ये सात वाहनांसह दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली. श्रीराम ज्ञानोबा तांबडे (वय २४, रा. उबाळेनगर, वाघोली, पुणे), दीपक कैलास परांडे (वय ३२, रा. रेणुका पार्क, उबाळेनगर, वाघोली) व योगेश अनंत मोराळे (वय २२, रा. बाणेगाव,, मु.पो. बाभळगाव, ता. केज, जि. बीड, सध्या रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोकुळे म्हणाले की, आज (शुक्रवार, दि. ८ जुलै, २०२२) पहाटे चारच्या सुमारास मारुती इको वाहनामध्ये ब्रँडेड दारूची गोवा-पुणे अशी वाहतूक होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी पाठलाग करून मंतरवाडी चौक, फुरसुंगी येथे पकडले. तिघांना ताब्यात घेऊन इको गाडीमध्ये मॅकडॉल, रॉयल स्टॅग, इंम्पेरियल ब्लू अशा एक हजार ३२ विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला. १९ जून ५० लीटर गावठी दारू तीन लाख ६९हजार, ६ जून ७७० लीटर गावठी हातभट्टी दारू, चारचाकी आठ लाख ९ हजार रुपये, २६ जून ४० लीटर गावठी हातभट्टी, दुचाकी एक लाख ५४ हजार ८०० रुपये, २९ जून आयशर ट्रक ६२ लाख १८ हजार ७७० रुपये, २९ जून ७३ किलो गांजा २० लाख ६२ हजार ९४० रुपये, २ जुलै ३१५ लीटर गावठी हातभट्टी ५ लाख ३१ हजार ५०० रुपये, ८ जुलै १०३२ विदेशी दारूच्या बाटल्या व मारुती इको ५ लाख २५ हजार असा एकूण एक कोटी ५४ लाख ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.