पुणे, दि.२७ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): आमदार आशीष जयस्वाल यांच्याशी असभ्य वर्तन करणे रामटेक पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला पडले महागात. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत एपीआयला निलंबित केले. विवेक सोनवणे, असे निलंबित अधिकाऱ्याचे नाव आहे.
सपन जयस्वाल यांचा रामटेकमध्ये पेट्रोल पंप आहे. १९
जुलैला रात्री ११ वाजताच्या सुमारास मोटारसायकलवर दोन युवक आले. तोपर्यंत पंप बंद
झाला होता. कर्मचाऱ्यांनी त्यांना पेट्रोल पंप बंद झाल्याचे सांगितले. तेव्हा त्या
दोघांनी पेट्रोल पंपावर दगडफेक केली. कर्मचाऱ्यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न
केला, तर कर्मचार्यांना दोघांनी शिवीगाळ केली. एका कर्मचाऱ्याने युवकाला कानाखाली
मारली. त्यानंतर दोन युवक, सपन व त्यांचे कर्मचारी रामटेक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आले.
पोलिस स्टेशनमध्ये एपीआय सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांना
मारहाण केली. माहिती मिळताच आमदार जयस्वालही पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. सोनवणे
यांनी आ.जयस्वाल यांच्यासोबत असभ्य वर्तण केले. जयस्वाल यांनी पोलिस अधीक्षक
विजयकुमार मगर यांच्याकडे तक्रार केली.
मगर यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना प्रकरणाच्या चौकशीचे
निर्देश देत सोनवणे यांची ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली. चौकशीत दोषी
आढळल्यानंतर सोनवणे यांना निलंबित करण्यात आले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर
शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर
फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes