Type Here to Get Search Results !

बाल्कनीचे गज वाकवून १ कीलो सोन्यासह, ३ किलो चांदीवर डल्ला

 


दि. 0 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): एक किलो सोन्यासह तीन किलो चांदी चोरणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. बिबवेवाडी परिसरात हा प्रकार घडला होता. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिबवेवाडी परिसरात एका फ्लॅटमधून सुमारे एक किलो सोने आणि तीन किलो चांदीचे दागिने चोरल्या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. 20 जून रोजी येथील एका अपार्टमेंटमध्ये घरातील सर्व लोक कुत्र्याचे पिल्लू विकत घेण्यासाठी बाहेर पडले असताना घर फोडल्याची ही घटना घडली. चोरट्याने बाल्कनीच्या खिडकीचे ग्रील वाकवून घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचा मौल्यवान ऐवज लंपास केला होता. त्यानंतर याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अन्सारी (34) उर्फ बोना उर्फ मुस्तफा या संशयित आणि हिस्ट्री शिटर गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे.

शनिवारी गुन्हे शाखेच्या युनिट-1च्या अधिकाऱ्यांना चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयितांची माहिती गोळा करत असताना, अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये हवा असलेला हिस्ट्री शीटर खडीमशीन परिसरात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. नातेवाईकाला भेटण्यासाठी हा आरोप कोंढवा परिसरात येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे, पोलिसांकडून परिसरात सापळा रचण्यात आला आणि शकील अन्सारी (34) उर्फ बोना उर्फ मुस्तफा या संशयितास अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत बिबवेवाडी फ्लॅट फोडण्यात त्याचा सहभाग उघड झाला. अन्सारीला पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट-1चे प्रभारी निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगितले, की अन्सारी हा गुन्हेगार असून त्याच्यावर पुण्यातील खडक, वानवडी, कोंढवा आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तसेच हैदराबादसह तब्बल 18 गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आता या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्या 18 गुन्ह्यांसह इतर आणखी कोणत्या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे, का याचा तपास पोलीस करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.