Type Here to Get Search Results !

विजय शिवतारेंच्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा, पण चर्चा मात्र बॅनरवरील फोटोंची

 


पुणे,दि.२८ जुलै (चेकमेट टाईम्स) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काल वाढदिवस झाला. राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. शिवसेना पक्षात मोठी बंडाळी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद गेले त्यानंतरचा त्यांचा हा पहिला वाढदिवस आहे. यामुळे बंडखोर नेते उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. मात्र त्या शुभेच्छा देताना त्यांनी 'शिवसेना पक्षप्रमुख' हा उल्लेख टाळला.

दुसरीकडे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मात्र शुभेच्छा देताना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आहे. या सगळ्यात शिवसेनेचे बंडखोर नेते आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या शुभेच्छांच्या बॅनरची राज्यभरात चर्चा सुरू आहे.

विजय शिवतारे यांनी आज उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी 'महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व! शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा' असा शुभेच्छा संदेश लिहला आहे. मात्र, या शुभेच्छा संदेशापेक्षा त्या बॅनरवरील फोटोंचीच जास्त चर्चा आहे. त्यांच्या शुभेच्छा बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. तर यात विशेष म्हणजे या बॅनरवर भाजपच्या नेत्यांचे फोटो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. नुकतेच विजय शिवतारे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिंदे गटात सहभागी होताना शिवतारे यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून भाजप सोबत युती करण्याची साद उद्धव ठाकरेंना घातली होती. त्यामुळे शिवतारेंचे हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.