Type Here to Get Search Results !

ब्रँडेड कपडे घालणाऱ्या तरुणांपासून सावधान!



दि. 02 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): प्रेम हे आंधळं असतं असं म्हटलं जातं. प्रेमात वय, जात-पात बघितली जात नाही. प्रेम करणं ही ज्याची त्याची खासगी बाब असते. कुणीही कुणावर प्रेम करू शकतो. मात्र कधी-कधी प्रेमात फसवणूक होते. बाहेरून सुंदर दिसणारी व्यक्ती कपटी आणि धोका देणारी निघते. माणूस ओळखता आला नाही की, प्रेमात फसवणूक होते आणि धोका मिळतो. त्यामुळे अनेकजण प्रेमात पडायला घाबरतात. दरम्यान, एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की, ब्रॅंडेड म्हणजेच महागडे कपडे घालणारे व्यक्ती प्रेमात जास्त धोका देतात. तज्ञांच्या मते, तुमचा भावी जोडीदार तुमची फसवणूक करेल अशी जर तुम्हाला भीती वाटत असेल, तर फक्त त्याच्या शर्ट किंवा पँटचे ब्रँड पहा. जर तुमच्या जोडीदाराने ब्रँडेड लोगो असलेले कपडे घातले तर तो तुमची फसवणूक करेल अशी खूप शक्यता असते. या प्रकरणात, आपली निवड पुन्हा तपासा. हा अभ्यास अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञाने केला आहे. अभ्यासात त्यांना असे आढळून आले की जे मुले ब्रँडेड टी-शर्ट किंवा शर्ट घालतात ते विश्वासार्ह नसतात.

यूकेमध्ये केलेल्या या अभ्यासातून फसवणूक करणाऱ्यांबाबत अनेक गोष्टी समोर आल्या. तज्ञांच्या मते, तरुणींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तरुण ब्रँडेड कपडे परिधान करतात. या कपड्यांमुळे तरुणी किंवा महिला त्यांच्याकडे आकर्षित होतात. तरुणींना वाटते की, हा तरुण जीवनात खूप यशस्वी असेल, त्याची चॉईस आणि जीवन जगण्याची शैली वेगळी आहे. त्यामुळे तो आपल्याला आयुष्यभर सुखी ठेवू शकतो. त्यामुळे त्या अशा तरुणांकडे जास्त आकर्षित होतात.

तज्ज्ञांच्या मते, ब्रँडेड कपडे घातलेले तरुण आपल्या आयुष्यात आपण सुखी असून यशस्वी झालो आहे असे मुद्दाहून दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनचे मानसशास्त्रज्ञ डॉ. डॅनियल क्रुगर यांच्या मते, जर तरुणांनी मोठ्या ब्रँडचे कपडे घातले तर ते धोका देतात. तर जी तरुण कमी ब्रँडची छोटा कपडे घालतात, ते विश्वासाला पात्र आहेत. ते त्यांचे पैसे दाखवत नाहीत. अशा परिस्थितीत, तरुणींनी त्यांच्या जोडीदाराच्या कपड्यांच्या ब्रँडवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.