दि. 01 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर दरात १९८ रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा नवीन दर १ जुलै पासून लागू होईल. या दर कपातीमुळे १९ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचा दर दिल्लीत २,०२१ रुपयांवर आला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर १९८ रुपयांनी स्वस्त झाल्याने रेस्टॉरंट्स, भोजनालये, चहाचे स्टॉल्स आणि इतरांना दिलासा मिळाला आहे. याआधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. १ मे रोजी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १०२.५० रुपयांनी वाढून २,३५५.५० रुपयांवर पोहोचली होती. एप्रिल आणि मार्चमध्येही १९ किलो व्यावसायिक एलपीजीची किमती अनुक्रमे २५० रुपये आणि १०५ रुपयांनी वाढली होती. याआधी घरगुती एलपीजी सिलिंडर जोडणी महागली आहे. यामुळे १४.२ किलो वजनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन जोडणीसाठी ग्राहकांना २ हजार २०० रुपये मोजावे लागत आहेत. जोडणी शुल्कातील ही वाढ ७७० रुपयांची आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84