Type Here to Get Search Results !

बिग बॉस फेम अभिनेत्री उपवासामुळे रुग्णालयात दाखल; बिल पाहून बसला धक्का

 


दि. 02 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्राकडून थेट अध्यात्मिक वाटेवर निघालेल्या एका अभिनेत्रीनं वेळोवेळी चाहते आणि नेटकऱ्यांना थक्क केलं आहे. अगदी तिच्या बोल्ड पोस्ट असो किंवा मग अध्यात्माशी संबंधित तिचं मत किंवा एखादी भूमिका असो. ती बोलली आणि चर्चा झाली नाही, असं फार क्वचितच घडलं. अशा या अभिनेत्रीनं नुकतंच शरीरातील अशुद्ध घटक बाहेर पडावेत या एका कारणासाठी उपवास केला होता. पण, हा उपवास फळणं दूर, तिला यामुळं त्रासच जास्त झाला. 

ही अभिनेत्री आणि बहुचर्चित मॉडेल म्हणजे सोफिया हयात. फास्टिंग आणि एनिमाच्या माध्यमातून ती शरीर शुद्धीकरणाचा सराव करत होती. पण, त्यादरम्यानच तिच्या शरीरातून मीठ आणि इलेक्र्टोलाईट्स कमी झाले. हे प्रमाण इकतं खाली गेलं की तिला परिचारिकांनी पाकिटंच्या पाकिटं मीठही खाण्याचा सल्ला दिला. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत सोफियानं तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. परिस्थिती इतकी वाईट झाली, की तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिथे तिला उपवास तोडून शरीरासाठी अन्नग्रहण करावं लागलं. 

सध्या तिची प्रकृती हळुहळू सुधारत आहे. रुग्णालयातून सोफियाला सुट्टी मिळाली आहे. असं असलं तरीही रुग्णालयाकडून तिच्या हाती टेकवण्यात आलेल्या बिलामुळं मात्र तिला धक्काच बसला आहे. युकेमध्ये तिच्या नावे आरोग्य विमा असल्यामुळं इथं तिला त्याचा फायदा झाला, अन्यथा खर्चाच्या आकड्यांनीही तिला अडचणीत आणलं असतं, अशीच परिस्थिती तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली. दरम्यान, सोफिया चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती बऱ्याच कारणांनी सर्वांच्या नजरा वळवत असते. मग ते कारण तिच्या खासगी जीवनाशी निगडीत का असेना. 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.