Type Here to Get Search Results !

पौड रोडवरील म्हातोबा टेकडीला होणार बिजाभिषेक; ब्राईट फ्युचर क्लबची संकल्पना

 


पुणे, दि.१५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): सायकलिंग करणे सायकलिंगबाबतची जनजागृती करत असताना, निसर्ग संवर्धन करणे, सिड बॉल्सची निसर्गात उधळण करणे, वृक्षारोपण करणे, झाडांना राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त करणे आणि चक्री वादळात असो की पुरात असो, अडल्या-नाडलेल्याना मदत करत, सायकल राईडची शतकी वाटचाल पूर्ण केलेल्या ब्राईट फ्युचर क्लबने यंदा पुन्हा एकदा निसर्गात सिड बॉल्सची उधळण करणे अर्थात बिजाभिषेक उपक्रम आयोजित केला आहे.

ब्राईट फ्युचर क्लबने गेल्यावर्षी महात्मा सोसायटी मागील टेकडीवर डुक्कर खिंडीपर्यंत सिड बॉल्सची उधळण केली होती. त्यातील अनेक बियांची झाडे झालेली प्रत्यक्ष जागेवर पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही वृक्षांचे रोपण करत ती जगवली आहेत. आता सध्या या भागातील रस्त्याच्या कडेला आणि टेकडीवर दिसत असलेली बहुतांशी झाडे ब्राईट फ्युचर क्लबच्या उपक्रमामधील यशाचे साक्षीदार आहेत.

ब्राईट फ्युचर क्लबच्या माध्यमातून आतापर्यंत काही हजार सीड बॉल निसर्गाच्या कुशीत टाकण्यात आले आहेत. माती, शेण आणि पाण्याचे मिश्रण केलेले चिखलाचे गोळे करून त्यात विविध फळ बिया आणि सावली देणाऱ्या झाडाच्या बिया घातल्या जातात, त्यालाच सीड बॉल म्हणतात. काही बियांची थेट उधळण देखील या उपक्रमात केली जाते. त्या बिया कुठल्या असतात तर, नुकताच झालेला आंबा, जांभूळ यांचा सिझन असेल की चिंचोके, जांभूळ, पपई, फणस, बहावा, गुलमोहर, रानटी बाभूळ आणि इतरही बिया जमा केल्या जातात. या बिया संकलित करून सीड बॉल बनविले जातात किंवा ज्यांचे सिड बॉल बनवले जात नाहीत ते नैसर्गिक पद्धतीने फलद्रूप होण्यासाठी निसर्गाला बहाल केल्या जातात.

अशा उपक्रमाची खूप अगोदर सुरुवात व्हायला हवी होती. मात्र उशिरा का होईना आम्ही सुरुवात केली आहे, तुम्हीही यात सहभागी व्हा, तुमच्या भागात असे उपक्रम राबवून निसर्ग संवर्धनाला हातभार लावा असे आवाहन ब्राईट फ्युचर क्लबचे संस्थापक, होम मिनिस्टर फेम बाळकृष्ण नेहरकर यांनी केले आहे. त्याचबरोबर सहभागी होण्यासाठी आणि बिया देण्यासाठी ९४२२०८०३१३ या क्रमांकावर संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे. या वर्षीचा बिजाभिषेक रविवार दि.17 जुलै २०२२ सकाळी ८.३० वाजता पौड रस्त्यावरील न्यू इंडिया स्कूल, उजवी भुसारी कॉलनी मागील टेकडीवर होणार आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.