पुणे, दि.३० जुलै (चेकमेट टाईम्स): कधी कधी मी महाराष्ट्रातील लोकांना सांगतो की मुंबई आणि ठाणे येथून गुजराती आणि राजस्थानी लोकांना हटवले तर तुमच्याकडे पैसाच उरणार नाही. तुम्ही या मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता पण गुजराती आणि राजस्थानी लोकं इथे नसतील तर मुंबईला आर्थिक राजधानी म्हणवताच येणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील जे.पी. रोड, येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उदघाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी
राज्यपालांनी गुजराती आणि राजस्थानी समाजाचे तोंडभरून कौतुक केले. मुंबई आणि
ठाण्याच्या विकासात आणि मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात गुजराती आणि
राजस्थानी समाजाचे मोलाचे योगदान आहे असे ते म्हणाले. मात्र गुजराती आणि राजस्थानी
लोकांना मुंबईतून काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणारच नाही, असे उद्गार कोश्यारी यांनी काढले आहेत. राज्यपालांनी
काहीदिवसांपूर्वी क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांच्याबाबत देखील वादग्रस्त
वक्तव्य केले होते. आता त्यांच्या शुक्रवारच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण
होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes