पुणे, दि.१८ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): इंदूरवरून अमळनेर येथे येणारी
अमळनेर डेपोची बस ही मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा
नदीत कोसळल्याचे वृत्त असून यात ४० प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
या
संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अमळनेर
डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची एमएच ४० एन ९८४८
क्रमांकाची बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून रिटर्न प्रवासात खरगोन आणि धार या
दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्या कलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात ही बस
रात्री कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची
प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, एस.टी. खात्याचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी या
अपघाताला दुजोरा दिला आहे. या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर या भीषण
अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेऊन रेस्न्यू ऑपरेशन सुरू केले
आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84