पुणे दि.१४ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : पानशेत
रस्त्यावरील सोनापूर गावच्या हद्दीतील नव्याने केलेला पूल खचला असून रस्त्याला
सुमारे पन्नास ते साठ मीटर लांब मोठी भेग पडली आहे. मागील वर्षी थोड्या प्रमाणात
खचलेल्या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने आता स्थानिक
नागरिक व पर्यटकांचा जीव टांगणीला लागला आहे. धक्कादायक म्हणजे पर्यायी रस्ता
नसल्याने कधीही कोसळेल अशा अवस्थेत असलेल्या पुलावरुन सध्या वाहतूक सुरू आहे.
मागील
वर्षीच्या पावसाळ्यात या पुलाला तडे गेले होते व काही भाग खाली धरणाकडे सरकला
होता. त्यावेळी दै. 'सकाळ'ने याकडे बातमीच्या माध्यमातून लक्ष वेधले होते
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही व केवळ वरवर भेगा
बुजवून वेळ मारुन नेली होती. परिणामी आता संपुर्ण पुलाने जागा सोडली असून खूप मोठी
भेग पडली आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने सद्यस्थितीत सदर पुल कोणत्याही क्षणी
कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पर्यायी रस्ता नसल्याने स्थानिक नागरिक व
हजारो पर्यटक या धोकादायक पुलावरुन ये-जा करत आहेत, त्यामुळे
सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज
आहे.
या धोकादायक स्थितीत असलेल्या पुलाच्या दुसऱ्या
बाजूला खडकवासला धरणाचे खोल पाणी आहे. रात्रीच्या अंधारात पुल कोसळल्यास
येणाऱ्या-जाणाऱ्या अनेक वाहनांचा अपघात होऊन अनेकांना त्यात जीव गमवावा लागू शकतो.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन
उपाययोजना करण्याची गरज आहे.
'मागील वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हा पुल धोकादायक झाल्याबाबत सांगत आहोत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी आता परिस्थिती खुपच भीषण झाली आहे. पुल कधीही कोसळेल अशा स्थितीत असून त्यामुळे पानशेतसह आजूबाजूच्या खेडेगावांचा पुर्ण संपर्क तुटणार आहे.' 'परिस्थिचे गांभीर्य लक्षात घेऊन मी स्वतः जाऊन पाहणी केली आहे. मागील वर्षी किरकोळ तडा गेलेला असल्याने दुरुस्ती करण्यात आली होती. आता मात्र मोठी भेग पडली आहे. एका बाजूने वाहतूक सुरू ठेवली असून तेथे लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नेमला आहे. पाऊस कमी झाल्यानंतर या ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.'
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84