पुणे दि. ११ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : उजबेकिस्तानमध्ये एक
विचित्र घटना घडली आहे. बहीण भावाने एकमेकांशी लग्न केलं. या दोघांचं जे बाळ
जन्माला आलं ते अत्यंत विचित्र स्वरुपाचं होतं. या बाळाची त्वचा सापासारखी दिसत
होती. अंगावर माशांच्या खवल्याप्रमाणे डाग होते. हे मूल जन्माला आल्याच्या काही
तासातच मृत्यूमुखी पडलं होतं. या जोडप्यातील महिलेचं पूर्वी एक लग्न झालं होतं आणि
तिला पहिल्या नवऱ्यापासून एक मूल आहे. ते मूल सामान्य होतं, मात्र या महिलेला भावापासून झालेलं हे मुल विचित्र होतं.
इंग्लंडमधील वर्तमानपत्र
‘मिरर’ ने दिलेल्या बातमीत म्हटलंय
की उजबेकिस्तानच्या डस्टीक प्रांतात राहणाऱ्या बहीण भावाने एकमेकांशी लग्न केलं.
लग्नानंतर महिलेने बाळाला जन्म दिला. ऑपरेशन थिएटरमध्ये ज्यांनी ज्यांनी हे बाळ
पाहिलं ते घाबरले होते. या बाळाला स्पर्श करायलाही कोणी तयार होत नव्हतं. या
बाळाला बरेच आजार होते. बाळाची त्वचा ही सापासारखी होती. त्वचा खडबडीत होती आणि
त्यावर माशाच्या खवल्यांप्रमाणे डाग होते. या बाळाला इश्थ्योसिस कॉग्नेशिया नावाचा
विकार होता. हा विकार अत्यंत दुर्मिळ असून बहीण भावाने एकमेकांशी लग्न केल्यानं झालेल्या
गुणसूत्रीय गुंतागुंतीमुळे झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84