पुणे, दि.१६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): 'सैराट' हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतील मौलाचा दगड. यामध्ये अभिनय करणारे अभिनेते आणि अभिनेत्री एका
रात्रीत स्टार झाले. त्यातीलच एक म्हणजे अरबाज शेख. अरबाज शेख याने सैराट चित्रपटात सल्ल्याची भूमिका
साकारली होती. रातोरात स्टार झालेल्या या
अभिनेत्याला पुण्यात रिक्षावाल्याकडून मनस्ताप सहन करावा लागला आहे. याबाबत
अरबाजने फेसबुक पोस्ट करत हे असले प्रकार थांबले पाहिजेत अशी मागणी केली आहे.
माझा आरोप हा सरसकट सर्व
रिक्षावाल्यांविरोधात नसल्याचे अरबाज शेख याने पोस्टच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले
आहे. मी पुण्यात माझ्या मित्राकडे आलो होतो, पुण्यातून संध्याकाळी ६
वाजताची माझी train होती. पाऊस चालू असल्यामुळे मी माझ्या मित्राला मला सोडायला येऊ
नको अस सांगितले , त्यामुळे त्याने
मला रॅपिडो अॅपवरून रिक्षा बुक करून दिली. नांदेड सिटी ते पुणे स्टेशन १९८ रुपये होतात. मी कधीच ओला, उबर,
रॅपिडो यांसारख्या अँपचा वापर करत नाही. नांदेड सिटी मधून रिक्षा
निघाली. रिक्षा चालकाने मला खूप फिरवले. मी त्याला सांगितलं दादा तू मला खूप फिरवत आहेस, त्यावर
त्याने काही उत्तर दिले नाही. ६० रुपये जास्तीचे मागायला सुरुवात केली. मी त्याला
विचारले का? तर त्यावर त्याने मला शिवी
दिली. पाऊस चालू आहे, तू
इथेच उतर, जास्त बोलू नको. मी रोज रिक्षा चालवतो, तू नाही, असे म्हणायला सुरुवात केली. मला सायंकाळी सहा वाजता गावी जाण्यासाठी ट्रेन पकडायची
असल्याने मी उतरू शकत नव्हतो, मी
त्याला माझी ओळख सांगितली नाही, आणि पुणे स्टेशन ला उतरून
त्याने सांगितले तेवढे पैसे मी त्याला pay केले. असा थरारक अनुभव अरबाजने आपल्या पोस्टमध्ये
लिहिला आहे.
पुण्यात राहणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर अशा घटनांना समोर जावं लागत असेल तर
गावावरून/फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येतात, त्यांचे
काय हाल होत असतील? हे लोक त्यांची किती लूट करत असतील? हे कुठे तरी थांबल पाहिजे. अपेक्षा करतो की,
यंत्रणा यावर मार्ग काढतील. अशा आशयाची फेसबुक पोस्ट करत अरबाजने
नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पुण्यात सध्या मुसळधार
पावसाने थैमान घातले आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. पुण्यात कार्यालय सुरू
होताना आणि सुटण्याच्या वेळेस तुफान ट्रॅफिक जाम लागत असल्याने पुणेकर आधीच हैराण
आहेत. त्यात एखाद्या कलाकाराला असा अनुभव येणे हे खरंच विचार करण्यासारखे आहे,
असे अरबाजने या पोस्टमध्ये म्हटले आहे. अरबाज शेख याच्या या
पोस्टनंतर आता पोलीस आणि वाहतूक विभाग संबंधित रिक्षाचालकावर काही कारवाई करणार का,
हे पाहावे लागेल.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84