Type Here to Get Search Results !

बिबवेवाडीतील सोबा सवेरा अपार्टमेंटमध्ये केली चोरी; ६० तोळे सोने लपवले बहिणीच्या घरात.

 


दि. 0 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): बिबवेवाडी परिसरात उच्चभ्रू सोसायटीत दिवसा घरफोडी करून ६० तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईताला बिबवेवाडी आणि युनिट एकने अटक केली. त्याशिवाय त्याला दागिने लपवण्यासाठी मदत करणाऱ्या दोन साथीदारांनीही जेरबंद करण्यात आले. अन्सारी याच्याकडे तपास करत असताना त्याने नातेवाइकांकडे हे दागिने लपवल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर अन्सारीच्या कोंढवा येथे राहणाऱ्या त्याच्या बहिणीच्या पतीची (मेव्हणे) चौकशी करत असताना पोलिसी खाक्या दाखवताच जुनेदने त्याच्या घरातील फ्रिजखाली दागिने लपविल्याचे सांगितले.

मुस्तफा शकील अन्सारी (रा. ग्रीन पार्क कोंढवा,पुणे) जुनेद रिझवान सैफ (२९, रा. कोंढवा, पुणे) आणि हैदर कल्लू शेख (३१, रा. पाखर सांगवी, बार्शी रोड, लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बिबवेवाडीतील सोबा सवेरा अपार्टमेंटमध्ये २० जूनला दिवसा तक्रारदार यांचे घर कुलुप लावून बंद असताना, अज्ञात चोरट्याने इमारतीच्या टेरेसचे लॉंक व गॅलरीला असलेल्या लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश करुन बेडरूममधील कपाटातील एकूण दीड लाखाची रोकड आणि ६० तोळ्यांचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून फिंगरप्रिंट विभागाची मदत घेतली. त्या वेळी सराईत मुस्तफा याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. दागिने लपवण्यासाठी आरोपीने दोन साथीदारांची मदत घेतल्याचे उघडकीस आले. आरोपींकडून सर्व ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपआयुक्त नम्रता पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी दागिने लपविणाऱ्या दोघांना कोंढवा आणि एकास लातूरमधून ताब्यात घेतले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी मुश्ताकला युनिट एकने अटक केली. त्याचा ताबा घेतल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी चोरीतील ६० तोळ्यांचे दागिने जप्त केले. ही कामगिरी उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, एपीआय प्रविण काळुखे, संतोष जाधव, सतिश मोरे, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, शिवाजी येवले, तानाजी सागर, राहुल शेलार यांनी केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.