पुणे, दि.२० जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): घरची परिस्थिती कोणत्याही स्वरुपाची असली तरी मुलांना
स्पर्धा परीक्षांचे लागलेले व्यसन शांत बसू देत नाही. अभ्यासात सातत्य अंगी जिद्द, चिकाटी, प्रामाणिक कष्ट घेतले तर यश
नक्कीच मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सीए (सनदी लेखापाल) परीक्षा पास होऊन शिक्षण
संस्थेत शिपाई पदावर काम करणाऱ्या वडिलांचे दिवा स्वप्न पूर्ण करत गावातील पहिला सीए
बनण्याचा मान मिळवला आहे. तो म्हणजे देवकरवाडी (ता.दौंड) येथील मयुर रोहिदास देवकर
याने.
विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना संघर्षाची
तयारी ठेवावी लागते. त्यातून यश नाही आले तर नैराश्य देखील येते. मुलांना यासाठी
कौटुंबिक आधाराची फार मोठी गरज असते. देवकरवाडी (ता.दौंड) येथील कैलास शिक्षण संस्थेत
शिपाई पदावर काम करत असताना रोहिदास देवकर यांनी देखील आपल्या मुलाच्या उज्वल
भविष्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. अगदी शालेय जीवनापासूनच त्याच्या बौद्धिक
क्षमतेला वाव देत ध्येयाप्रत नेण्याची भुमिका उत्तम प्रकारे पार पाडली आहे.
मयूर याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकरवाडी
येथे झाले असून वाडे बोल्हाई सिद्धाचलंम चारीटेबल ट्रस्ट येथे माध्यमिक शिक्षण तर
उच्च शिक्षण मॉडर्न कॉलेज पुणे येथे झाले आहे. सीए परीक्षेचा सलग सहा वर्ष अभ्यास
करत दुसऱ्या प्रयत्नात त्याने हे दैदिप्यमान यश संपादन करत गावातील पहिलाच सीए
बनण्याचा बहुमान मिळवला आहे. यावेळी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला असून यशाबद्दल संपूर्ण परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84