पुणे, दि.२६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): अवैध
सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलिसांची मदत घेऊन गुन्हे दाखल करावेत. सहकार
निबंधकांनी अधिक तपासणी करून योग्य पद्धतीने गुन्हे दाखल होतील याकडे लक्ष द्यावे, असे
निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमाबाबत समितीची बैठक
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. शहर जिल्हा उपनिबंधक
नारायण आघाव, पोलिस उपायुक्त
श्रीनिवास घाडगे, पिंपरी चिंचवडचे सहायक आयुक्त पद्माकर घनवट,
पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक बाळासाहेब तावरे यांच्यासह इतर
उपनिबंधक या वेळी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, अवैध
सावकारीविरोधात तक्रारी करण्याच्या अनुषंगाने पीडित नागरिकांनी पुढे येण्यासाठी
जनजागृतीची गरज आहे. तक्रारदारांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. सहकार
विभागाला कायद्यान्वये व्यापक अधिकार असून, व्याजाच्या
पैशाच्या बदल्यात केलेली खरेदीखते रद्द करण्याचे अधिकार सहकार विभागाला आहेत.
त्याचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी करावा.
आघाव म्हणाले, अवैध
सावकारी रोखण्यासाठी सर्व तालुक्यांत स्थायी भरारी पथके नेमली आहेत. पोलिस,
सहकार विभाग आणि महसूल विभागाच्या समन्वयाने काम सुरू आहे. हा आता
दखलपात्र गुन्हा करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील स्थिती :
- परवानाधारक खासगी सावकार १ हजार ४५६
- परवाना नूतनीकरण ४०४
- परवाना नूतनीकरण प्रलंबित ९८२
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84