दि. 02 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): नेत्रतज्ज्ञ डॉ.श्रीकांत केळकर यांचे पिता भास्कर गंगाधर केळकर यांचा ब्रिटिशकालीन शंभर वर्षांपूर्वीचा पासपोर्ट आणखी शंभर वर्षे टिकण्यासाठी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने प्रक्रिया करून जतन करण्यात मदत केली आहे.केळकर कुटुंबीयांनी नुकताच हा पासपोर्ट भांडारकर प्राच्यविद्या संस्थेकडे शास्त्रीय प्रक्रियेसाठी दिला.भांडारकर संस्थेने त्यावर योग्य ती शास्त्रीय प्रक्रिया करून,काही फाटलेली पाने चिकटवून त्याचे आयुष्य पुढील शंभर वर्षे वाढवले आणि पुन्हा केळकर कुटुंबियांना सुपूर्त केला. डॉ.भास्कर गंगाधर केळकर यांचा हा पासपोर्ट ८ ऑगस्ट १९२१ सालचा आहे. एम.बी.बी.एस.पर्यंत शिक्षण झाल्यावर लंडन मध्ये 'डिप्लोमा इन ऑप्थल्मोलॉजी'हे पुढील शिक्षण करण्यासाठी हा पासपोर्ट काढला होता.मात्र,पुण्यात अपघात झाल्यावर त्यांचे परदेशगमन रद्द झाले.त्यामुळे परदेश गमनाचे शिक्के त्यावर नाहीत.भास्कर गंगाधर केळकर यांची आठवण म्हणून केळकर कुटुंबीयांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे,पासपोर्ट जपून ठेवली.त्यावेळी भारतावर ब्रिटिश राज्य असल्याने या पासपोर्टवर नॅशनॅलिटी रकान्यासमोर 'ब्रिटिश सब्जेक्ट' लिहिले आहे.येत्या ऑगस्टमध्ये या पासपोर्ट ला १०१ वर्षे होणार आहेत.डॉ.भास्कर गंगाधर केळकर हे प्रसिद्ध केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर यांचे थोरले बंधू होत.
डॉ.श्रीकांत केळकर म्हणाले,'हा पासपोर्ट आमच्या कुटुंबीयांचा महत्वाचा ठेवा असून तो जतन व्हावा अशी इच्छा होती. भांडारकर संस्थेत जुनी कागदपत्रे, ग्रंथ प्रक्रिया करून ठेवले आहेत.त्यामुळे हा पासपोर्ट देखील आमच्या संग्रहात जतन करण्यासाठी शास्त्रीय प्रक्रिया करण्यात भांडारकर इस्न्टिट्यूटची मदत होईल,याची खात्री असल्याने आम्ही निर्णय घेतला.प्रक्रिया पूर्ण होऊन आयुष्य वाढलेला हा पासपोर्ट अनमोल ठेवा बनून पुन्हा आमच्या घरी आला आहे.' 'भांडारकर संस्थेत सुरू असलेल्या ग्रंथजतन प्रकल्पांतर्गत अनेक संस्थांना ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. वैयक्तिक ठेवा जतन करून देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कुटुंबातील दुर्मीळ कागदपत्रे जपण्याची अनेकांना हौस असते. हे ओळखून आम्ही ही सेवा सुरू केली आहे. या निमित्ताने संस्थेत लोकांचा राबता वाढेल आणि संस्थेला त्याचा फायदा होईल,' असे मत संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes