Type Here to Get Search Results !

“लवकरच घरी जेवायला या, काहीतरी स्पेशल करते;” सुप्रिया सुळेंचं चंद्रकांत पाटलांना खास आमंत्रण

 


पुणे, दि.३० जुलै (चेकमेट टाईम्स): झी मराठीवर येणाऱ्या बस बाई बस या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना घरी जेवायला येण्याच खास आमंत्रण दिले. झी मराठीवर येणाऱ्या सुबोध भावे यांच्या बस बाई बस या कार्यक्रमात सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. याचदरम्यान त्यांनी चंद्रकांत पाटलांना घरी जेवायला येण्याचं आमंत्रणही दिलं.

पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंना घरात लक्ष द्यावं असं म्हटलं होतं. त्या वर सुप्रिया सुळे यांनी बोलताना हसत उत्तर दिलं. घरी वहिनींना सांगा मी विचारलं आहे आणि लवकर घरी जेवायला या. तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी करते,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. माझे सर्व पक्षीय लोकांशी संबंध चांगले आहेत, असंही त्या म्हणाल्या. सुबोध भावे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी चंद्रकांत पाटलांना घरी आमंत्रित केलं.

यावेळी सुप्रिया सुळे यांना घरी काम करण्याचा त्यांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल प्रशअन विचारण्यात आला. मला त्याचं फार काही वाटलं नाही. मी एक महिला आहे. होममेकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. स्वयंपाक करण्याला मी कमीपणा समजत नाही. विरोधक जे बोलतात ते मनाला लावून घेत नाही,” असंही त्या म्हणाल्या.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.