Type Here to Get Search Results !

कंपनीतील तरुणीचा मालकाकडून विनयभंग; मालकाच्या विरोधात गुन्हा.

 


पुणेदि.२६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचा मालकाने विनयभंग केल्याची घटना गुरुवार पेठेत घडली. या प्रकरणी कंपनी मालकाच्या विरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाबर जब्बार खान (वय ४२, रा. साहेर अपार्टमेंट, गुरुवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खान याची वातानुकूलन यंत्रणा दुरुस्ती देखभाल करणारी कंपनी आहे. या कंपनीत तरुणी काम करते. गेल्या काही महिन्यांपासून खान तरुणीला त्रास देत होता. त्याने तिचा विनयभंग केला तसेच तिच्या मोबाइल क्रमांकावर अश्लील संदेश पाठविले. खान याच्या त्रासामुळे तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.

या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायदा (पोक्सो) तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुतवळ तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.