पुणे दि. ११ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : दोन प्रोढ व्यक्तींमध्ये जर
सहमतीनं लैंगिक संबंध प्रस्थापित झाले असतील जे फसवणुकीच्या उद्देशानं किंवा खोटी
माहिती देऊन झाले असतील तर तो कलम ३७६ अंतर्गत बलात्कार ठरु शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल केरळ हायकोर्टानं
दिला आहे. न्या. बी. के. थॉमस यांनी हे नरिक्षण
नोंदवताना अॅड. नवनीत नाथ यांना जामीन मंजूर केला.
अॅड. नवनीत नाथ
यांनी एका महिला वकिलाला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी शाररीक संबंध
प्रस्थापित केले आणि नंतर आपल्या वचनाचा भंग करीत दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा
आरोप त्यांच्यावर आहे. यावर फिर्यादी पक्षानं आरोप केला की, ज्यावेळी पीडितेला या संभाव्य लग्नाबद्दल
कळलं तेव्हा तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर अॅड. नाथ यांना कलम ३७६ (२)(n), कलम ३१३ अंतर्गत २३ जून रोजी अटक केली
होती.
यावर कोर्टानं
म्हटलं की,
जरी दोन इच्छुक जोडीदारांमधील लैंगिक
संबंध विवाहात परावर्तीत होत नसले तरीही, लैंगिक संबंधाच्या संमतीसाठी कोणतेही घटक कारणीभूत नसतील ते बलात्काराचे
प्रमाण ठरणार नाही. पण नंतर लग्नास नकार देणे किंवा नातेसंबंधाचं रुपांतर लग्नात
होण्यास अपयश येणं हे घटक बलात्कारास पुरेसं ठरत नाही. कोर्टानं पुढे असंही म्हटलं
की, स्त्री आणि पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध
केवळ तिच्या इच्छेविरुद्ध किंवा तिच्या संमतीशिवाय किंवा सक्तीने किंवा फसवणूक
करून संमती मिळाल्यावरच बलात्कार ठरू शकतात.
"लग्नाच्या
वचनाचे पालन न केल्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यातील शारीरिक संबंध बलात्कार
तेव्हा ठरेल,
जेव्हा वचन देणाऱ्याला आपला शब्द पाळायचा
नसेल आणि वचन देऊन त्यानं स्त्रीला शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले असेल.
अशा प्रकारे शारीरिक मिलन आणि लग्नाचे वचन यांच्यात थेट संबंध असल्यासच तो
बलात्कार ठरतो,''
असंही कोर्टानं यावेळी टिपण्णी करताना
म्हटलं.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84