Type Here to Get Search Results !

पुणेकरांना दिलासा! मागील 24 तासांत 4 धरणात जमा झाला इतका पाणीसाठा

 


पुणे दि. 0  जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे नद्या-नाले तुडूंब भरुन वाहत आहेत.यातच पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. 

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांच्या पाणीपातळीत जवळपास १ टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ते ५.४५ टीएमसी इतके झाले आहे. गेल्या महिनाभरापासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तूट झाली होती. पाऊस आता थोडासा कमी झाला आहे. मात्र, पुढील काही दिवसांत या भागात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने  वर्तवला आहे.

गेल्या आठवड्यात पावसाच्या कमतरतेमुळे मुठा नदीच्या प्रवाहातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतील पाणीसाठा २.५ टीएमसीवर गेला होता. यानंतर राज्याच्या जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) सतर्क केले आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले. त्यानुसार, पीएमसीने ४ जुलैपासून शहरातील पाणीपुरवठा एका दिवसाआड केला होता. आता सणासुदीच्या दिवसांचा हवाला देत ११ जुलैपर्यंत पाणी पुरवठा पूर्ववत केला आहे. मात्र, नंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.

पुण्यातील या धरणांमध्ये गुरुवारी सकाळी ४.५१ टीएमसी पाणीसाठा होता, तो शुक्रवारी सकाळी ५.४५ टीएमसी झाला. गेल्या २४ तासांत वरसगाव पाणलोट क्षेत्रात ५५ मिमी, पानशेतमध्ये ६० मिमी, टेमघरमध्ये ८१ मिमी आणि खडकवासलामध्ये १३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुण्याजवळच्या धरणांची उपयुक्त पाणी साठवण्याची क्षमता पुढीलप्रमाणे आहे -

·         खडकवासला- १.९७ TMC (थाउजंड मिलियन क्यूबिक फूट)

·         पानशेत - १०.६५ TMC

·         वरसगांव- १२.८२ TMC

·         टेमघर- १० TMC + . TMC


"दररोज हे अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा"

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.