पुणे, दि.१५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): ‘सुखस्य मूलं धर्मः।’, म्हणजे सुखाचे
मूळ धर्माचरणात आहे. समाज आणि राष्ट्र सुरळीत चालवायचे असेल, तर धर्माच्या अधिष्ठानाची सर्वच क्षेत्रांत
आवश्यकता आहे. व्यक्तीगत किंवा सामाजिक जीवनात धर्माचे अधिष्ठान आले की, व्यक्ती नीतीमान बनतो आणि गैरप्रकार
करण्यापासून परावृत्त होतो. त्यामुळे धर्माचे अधिष्ठान असेल, तरच धर्मनिष्ठ अर्थात् आदर्श अशा समाजाची
निर्मिती होऊ शकते. त्यामुळे राष्ट्राला खर्या अर्थाने उर्जितावस्था मिळवायची
असेल, तर प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन, धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि
धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. काळानुसार हिंदु
राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या
समष्टी रूपाची सेवाच आहे, असे प्रतिपादन
श्री. चैतन्य तागडे यांनी या वेळी केले. सनातन संस्थेच्या वतीने आयोजित
गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते.
१) गणेश सभागृह,एरंडवणे,पुणे २) विणकर सभागृह ,धनकवडी ३)
सिद्धार्थ सभागृह ,माणिक बाग,सिंहगड रस्ता,पुणे याठिकाणी
गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तसेच सनातन संस्थेच्या
वतीने देशभरात १५४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा
महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर युवा
प्रतिष्ठानचेश्री.विद्याधर नारगोलकर,प्रखरहिंदुत्वनिष्ठ
अधिवक्ता निलेश निढाळकर आणि वीर सावरकर युवा विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ.
निलेश लोणकर यांनीही उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. महोत्सवाच्या प्रारंभी
श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.या वेळी ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ दाखवण्यात आली.या
कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते.
९ भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’ : यंदाच्या वर्षी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलुगु, गुजराती, बंगाली, ओडिया या ९ भाषांत ऑनलाईन
गुरुपौर्णिमा महोत्सवही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील हजारो
भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला. देशभरात अन्य ठिकाणी झालेल्या
गुरुपौर्णिमांच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी
गुरूंकडून शिकणे’, मराठी भाषेतील ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास’, तसेच इंग्रजी भाषेतील ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेज् स्पिरिच्युअल वर्कशॉप्स इन १९९२, ‘सिकर्स रिव्हील युनिक फेसेटस् ऑफ परात्पर गुरु
डॉ. आठवले’, ‘एफर्टस् ॲट द स्पिरिच्युअल लेवल फॉर रिमूव्हल
ऑफ पर्सनॅलिटी डिफेक्टस्’ आणि ‘हाऊ टू प्रोग्रेस फास्टर स्पिरिच्युअली थ्रू सत्सेवा?’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84