पुणे, दि.२६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): महापालिका
भवनाची साफसफाई करण्यासाठी मागविलेल्या निविदेवरून सध्या वाद निर्माण झाला आहे.
काळ्या यादीत टाकलेल्या, तसेच कामगारांची देणी थकविलेल्या
ठेकेदार कंपन्यांना पात्र करण्याचे ‘उद्योग’ सुरू असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. त्यावर प्रशासन काय भूमिका घेणार?
नियमानुसार अपात्र ठरणाऱ्या ठेकेदार कंपन्यांना पात्र करणार का?
याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महापालिका भवनातील साफसफाईचे काम कंत्राटी पद्धतीने केले
जाते. त्यासाठी दरवर्षी निविदा मागविल्या जातात. यंदाही प्रशासनाकडून या कामासाठी
तीन कोटींची निविदा काढली आहे. या कामासाठी सहा कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत.
त्यापैकी एका कंपनीला महापालिकेच्या एका विभागाने काळ्या यादीत टाकले आहे, तर दुसऱ्या एका कंपनीने कामगारांचा पीएफ
आणि अन्य रकमेचा भरणा केलेला नाही, म्हणून त्यांची चौकशी
सुरू आहे. त्यामुळे या दोन कंपन्यांवर अन्य ठेकेदार कंपन्यांनी आक्षेप घेतला आहे.
मात्र, प्रशासन त्यावर निर्णय घेण्याऐवजी ते पात्र कसे होतील,
यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप होत आहे.
यासंदर्भात महापालिकेच्या घनकचरा विभागप्रमुख आशा राऊत
यांनी ‘निविदा प्राप्त
झाल्या असून, छाननीचे काम सुरू आहे,’ असे
सांगून बोलणे टाळले. त्यामुळे प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84