पुणे दि. १२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : पाणी वाहतूक करणाऱ्या
टँकर व्यावसायिकाकडे २० हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा
विभागातील उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)
सोमवारी पकडले.
या प्रकरणी पाणी पुरवठा विभागातील उपअभियंता मधुकर दत्तात्रय थोरात (वय ५६), कनिष्ठ अभियंता अजय
भारत मोरे (वय ३७) यांच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. याबाबत टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाने फिर्याद दिली
आहे. थोरात आणि मोरे महापालिकेच्या बंडगार्डन पाणी पुरवठा विभागात नियुक्तीस आहेत.
टँकर मार्फत पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाना पाणी पुरवठा विभागातून परवाना
घ्यावा लागतो. प्रत्येक टँकर भरताना एक परवाना सादर करावा लागतो.
दर दिवशी पाचपेक्षा जास्त टँकर भरून पाहिजे असल्यास दरमहा वीस हजार रुपये
द्यावे लागतील, असे कनिष्ठ अभियंता मोरे यांनी सांगितले. त्यानंतर व्यावसायिकाने लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी
करुन थोरात, मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक राजेश बनसाेडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज
गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप
कुऱ्हाडे तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84