पुणे
दि १३ जुलै (चेकमेट टाईम्स): शिक्षणाच्या ओढीने तिने कॉलेजची फी भरण्यासाठी ऑनलाईन कर्ज घेण्याचा प्रयत्न केला.
पण त्यातून तिच्या वाट्याला बदनामीच आली. ऑनलाईन कर्जाच्या या सायबर चोरट्यांच्या
फसवणुकीत आणखी एक तरुणी बदनामीची शिकार ठरली आहे. याप्रकरणी लोहगाव येथील एका २१
वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ११
फेब्रुवारी ते ११ जुलै २०२२ दरम्यान घडला आहे.
याबाबत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कॉलेज शिक्षण घेत आहेत. त्यांना कॉलेजची फी
भरण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यांनी गुगल प्ले स्टोअरवरुन कोको अॅप डाऊन
लोड केले. सर्व माहिती अपलोड केली. त्यानंतर त्यांना झारखंडवरुन फोन येऊ लागले.
त्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे व फोटोतील चेहर्याचा वापर करुन पॉर्न व्हिडिओ,
न्यूड फोटो तयार केले. हे फोटो व
व्हिडिओ त्यांना पाठवले. ते सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी
दिली. फिर्यादी यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील मैत्रिणीला या मार्फ केलेले व्हिडिओ व
फोटो पाठवून बदनामी केली. विमानतळ पोलीस तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84