दि. 01 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स):वाढदिवसाचा केक मित्राच्या तोंडाला लावण्यासाठी त्याच्यामागे पळणाऱ्या एकाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केल्याप्रकरणी दोन मजुरांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने या दोघांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. बावधन येथे वाढदिवस साजरा करताना शांत राहण्यास सांगितल्याच्या वादातून झालेल्या खून प्रकरणात हिंजवडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. चंदनकुमार जयकिशोर झा (वय २२) आणि हेमंत राजू थापा (वय २०, दोघे रा. गंगा लिजंड सोसायटी, लेबर कॅम्प, बावधन) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. या हल्ल्यात नितेश दीपक शेलार (वय १९, रा. बावधन) जखमी झाले असून, त्यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २५ जून रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84