पुणे, दि.१६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): स्वयंपाक
बनवण्याच्या कारणावरून सुनेने ७१ वर्षीय सासूचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला
आहे. ही घटना चाकण येथे घडली असून पोलिसांनी सुनेला बेड्या ठोकल्या आहेत. सुषमा
अशोक मुळे वय- ७१ अस खून करण्यात आलेल्या सासूचे नाव असून सुवर्णा सागर मुळे वय-
३२ अस अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनोद
शेंडकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, मयत सासू
सुषमा, आरोपी सून सुवर्णा आणि पती हे एकत्र
राहतात.
मयत सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात नेहमी भांडण
व्हायचं. सुवर्णा हिला तीन वर्षांचा मुलगा आहे. तो, सासू सुषमा
यांच्याकडे सोडून शेजारी गप्पा मारत बसायची. यावरून ही सासू सुनात अनेकदा वाद
झाले. सुषमा यांना फिट, शुगर आणि बीपी चा आजार होता. सुवर्णा चा पती कामावर
गेल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा स्वयंपाक बनवण्यावरून दोघींमध्ये वाद झाला.
त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. तेव्हाच, सुवर्णा ने नायलॉन
दोरी घेऊन सासू चा गळा आवळला.
सासू बेशुद्ध झाल्याच पाहून पतीला फोन करून बोलावून
घेतलं, आई ला फिट आली आणि त्या बेशुद्ध झाल्या एवढंच सांगून
सासूला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. तिथं सुषमा यांना मृत घोषित करण्यात आलं.
डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी चाकण पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ
रुग्णालयात घेऊन सुनेची विचारपूस केली, त्या फिट येऊन बेशुद्ध
पडल्या एवढंच आरोपी सून सांगत होती. अखेर, शवविच्छेदन अहवालात
गळा आवळून खून झाल्याचं पुढे आलं अन आरोपी सुनेला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84