दि. 02 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पोटच्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आई-वडिलांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. करन नाना हेगडे (वय २८) व शीतल करन हेगडे (२२) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या हेगडे दाम्पत्या जवळ एक चिट्टी आढळून आली. यामध्ये बाळा आम्ही तुझ्याकडे येत आहे. मुलीचा झालेला मृत्यू सहन झाला नाही, यामुळेच आत्महत्या करत असून यास कोणास ही जबाबदार धरू नये असे या चिट्टीत लिहिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, करण व शीतल यांच्या दोन वर्षीय
मुलीचा मागील चार-पाच दिवसांपूर्वी जेवण करत असताना घशामध्ये घास अडकून अचानक
मृत्यू झाला होता. मुलीचा असा अचानक झालेला मृत्यू व तिची झालेली धडपड यामुळेच
मुलीच्या मृत्यू नंतर हेगडे दाम्पत्य नैराश्यामध्ये होते. त्याच्या नात्यातील एका
व्यक्तीच्या तक्रारी वरून त्याच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
परस्पर विरोधी तक्रारी मुले हेगडे कुटूंबीय व्यतीत होते. राजेवाडी येथील काळा मळा
परिसरातील कानिफनाथ मंदिरालगत एका झाडाला करण व शीतल यांनी एकाच दोरीने गळफास घेऊन
आत्महत्या केली आहे. याबाबत घटनास्थळी आटपाडी पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदन
करण्यासाठी पाठविले.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes