Type Here to Get Search Results !

लग्न झाल्याची बनावट कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल करुन तरुणीची बदनामी; चंदननगरमध्ये दोघांविरूध्द गुन्हा

 


पुणेदि. जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): विवाह झाला नसतानाही विवाह झाला असल्याची बनावट कागदपत्रे तयार करुन ती समाजातील विविध मॅरेज ग्रुपवर टाकून तरुणीची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी खराडी येथे राहणार्‍या एका २३ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २६८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी इम्रान समीर शेख (रा. विकासनगर, घोरपडी) आणि शेख खलील शेख जलील (रा. इस्मालपुरा, अमदापूर, बुलढाणा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ जुलै रोजी घडला.

इम्रान शेख याने शेख जलील यांच्या मदतीने फिर्यादी यांची व त्यांच्या कुटुंबियांची समाजामध्ये बदनामी व्हावी, या उद्देशाने हा सर्व प्रकार केला आहे. फिर्यादी यांचा विवाह कोणाशीही झालेला नसल्याचे माहिती असतानाही त्या दोघांनी फिर्यादी यांचा इम्रान शेख याच्याशी विवाह झाल्याचे दाखविणारे फोटो, नाव टाकून, खोटी सही, अंगठा असलेले खोटे व बनावट मॅरेज सर्टिफिकेट तसेच निकाहनामा फॉर्म तयार केला. तो खरा असल्याचे व त्यांच्या समाजातील लोकांना कळावे, यासाठी समाजातील विविध मॅरेज ग्रुपवरील व्हॉटसअपवर मॅरेज सर्टिफिकेट व निकाहनामा टाकून फिर्यादी यांचे इम्रान शेख याच्याशी विवाह झाल्याचे दाखवून बदनामी केली. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.