दि. 08 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): शिक्रापूर येथील सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवाना देण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ४० हजार लाच देण्याचे ठरले. सुरूवातीला १२ हजार रुपये लाच देताना संजय कडाळे ( सहाय्यक अधीक्षक, जिल्हा रुग्णालय पुणे) ) लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले.
ही लाच
घेण्यामध्ये रुग्णालयातील डॉ. माधव कणकवळे व जिल्हा शल्य चिकित्सक महादेव गिरी
यांचाही अप्रत्यक्ष संबंध होता. त्यांनीच या लाचेची मागणी फिर्यादीकडे केली होती. संजय
कडाळे, डॉ. माधव
कणकवळे व महादेव गिरी हे औंध येथील जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. या तिघांवर
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने
तक्रार दाखल केल्यानंतर ६ जुलैला सापळा रचण्यात आला होता. फिर्यादीकडून लाच
घेण्यासाठी आरोपी संजय कुडाळ घटनास्थळी आल्यानंतर एसीबीने कारवाई केली. आरोपी
कुडाळसह त्याच्याकडील १२ हजार रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण
निंबाळकर, पोलीस
उपअधीक्षक सीमा अडनाईक, पो. हवा. नवनाथ वाळके, पो. हवा. अंकुश माने, चालक पो. कॉ. पांडुरंग माळी यांनी केली.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes