Type Here to Get Search Results !

कंपनीतील कर्मचाऱ्याकडे खंडणीची मागणी; माथाडी संघटनेचा पदाधिकारी अटकेत



पुणे,दि.२८ जुलै (चेकमेट टाईम्स) : पुण्यातील खासगी कंपनी तसेच व्यावसायिकांना कामगार पुरविणाऱ्या ठेकेदाराकडे खंडणी मागणाऱ्या एका माथाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. ओंकार रमेश हिंगे (वय २३, रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत खासगी कंपनीतील एका कर्मचाऱ्याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या कंपनीकडून खासगी कंपन्यांना कामगार उपलब्ध करुन देतात.

अप्पर इंदिरानगर- गंगाधाम रस्ता परिसरात व्यावसायिकांना तक्रारदाराच्या कंपनीकडून कामगार उपलब्ध करुन देण्यात आले होते. हिंगे तक्रारदाराला काही दिवसांपूर्वी भेटला. मी माथाडी संघटनेचा पदाधिकारी आहे. या भागात काम करायचे असेल तर माझ्या संघटनेकडून सुचविण्यात आलेल्या कामगारांना काम द्यावे लागेल. माझ्या संघटनेतील कामगारांकडून सर्व कामे करुन घ्यावी लागतील तसेच दरमहा ४० हजार रुपये एवढा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी हिंगेने तक्रारदाराला दिली. त्यानंतर तक्रारदाराने बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजकुमार बरडे आणि पथकाने सापळा लावून हिंगेला पकडले. हिंगेने अशा प्रकारे खंडणी मागण्याचे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असून तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सहायक निरीक्षक बरडे तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.