पुणे,दि.२८ जुलै (चेकमेट टाईम्स) : चालत्या गाडीत दाम्पत्याने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नगर – औरंगाबाद महामार्गावरील बाभुळवेढे शिवारात शनि चौथऱ्याजवळ घडली. या घटनेत पती आणि पत्नी दोघेही गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे एक जोडपे आपल्या चार चाकीतून औरंगाबादहून – पुण्याकडे चालले होते. यावेळी त्यांचे गाडीत काही कारणामुळे कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात पतीने गाडीतच पेटवून घेतले. दरम्यान या घटनेत पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेत कार अक्षरश: जळून खाक झाली आहे. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याने घटनेचा खरा उलगडा झाला नाही. या प्रकरणी अधिक तपास नेवासा पोलिस करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes