Type Here to Get Search Results !

उपचारासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर डॉक्टरचा बलात्कार; कोथरूड मधील धक्कादायक घटना

 


पुणे दि. 0  जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या डॉक्टरने तरुणीचे मोबाईलमध्ये नग्न अवस्थेतील फोटो काढले आणि याविषयी कुणाला काही सांगितल्यास सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

डॉ. योगेश लक्ष्मण वाल्हे (वय ४५, अमोल एनक्लेव्ह, कोटकर लेन भाऊ पाटील रोड, औंध) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हा सर्व प्रकार नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत घडला. ह्या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कोथरूड परिसरातील पौड रस्त्यावर डॉ. योगेश वाल्हे यांचे क्लिनिक आहे. तरुणी मणक्याच्या आजाराचे उपचार करण्यासाठी त्या ठिकाणी आली होती. यावेळी ही तरुणी अल्पवयीन असल्याची माहित असतानाही संबंधित डॉक्टरने तिच्या वयाचा गैरफायदा घेतला आणि उपचार करण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत वारंवार हा प्रकार घडला. संबंधित डॉक्टर आरोपीने फिर्यादीचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाईल मध्ये काढले आणि याविषयी कोणाला काही सांगितल्यास हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.