पुणे, दि.१६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे
महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी तयार करण्याची मुदत आणखी पाच
दिवसांनी वाढवली आहे. २१ जुलै पर्यंत ही मुदत देण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या
निवडणुकीसाठी २३ जून रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली, त्यामध्ये मोठ्याप्रमाणात चुका असल्याने इच्छुक उमेदवार, मतदार, राजकीय पक्षांनी पावणे पाच हजार हरकती नोंदविल्या
आहेत. या हरकतींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी लागते. त्यासाठी प्रत्येक
क्षेत्रीय कार्यालयनिहाय २५ जणांचे पथक तयार करण्यात आले होते.
हे काम
खूप किचकट व वेळखाऊ असल्याने महापालिकेने अंतिम मतदार यादी जाहीर करण्यासाठी मुदत
वाढवून मागितली होती. त्यात १६ जुलै पर्यंतची मुदत दिली होती. शहरात गेल्या
आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्याचाही
परिणाम प्रारूप मतदार यादीतील हरकती पडताळणीच्या कामावर झाला आहे. त्यामुळे या
कामासाठी आणखी एक मुदतवाढ द्यावी अशी मागणी महापालिकेने केली होती. त्यानुसार
निवडणूक आयोगाने २१जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी जाहीर करण्यासाठी मुदत दिली आहे.
त्याबाबतचे पत्र महापालिकेला मिळाले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात
आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84