पुणे, दि.२७ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): कर्वेनगर
मावळेआळी चौकामधे अनेक महिन्यांपासून या ठिकाणी अवैध धंदे सुरू
असून, या
ठिकाणी अनेक हातगाड्या, तसेच भाजी विक्रेते विविध
साहित्यांची किराणामाल यांची दुकाने असून, नागरिकांची
विशेषत: महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, पण या अवैध
धंद्यांमुळे मद्यपी रस्त्यावर धिंगाणा घालत अश्लील वर्तन करतात. वारजे पोलीस या व्यवसायांना छुपा पाठिंबा देत आहेत. मद्यपींकडून महिलांना
खुलेआम छेडछाड करण्यात येत आहे. मात्र, तरीही पोलिसांचे
दुर्लक्ष होत असल्याने, स्थानिकांनी रोष
व्यक्त केला आहे.
त्यामुळे या चौकात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांच्या
मनात मद्यपींची भीती निर्माण झाली आहे. अनेकदा छेडछाडीच्या घटना घडत असून, वारजे पोलीस अतिशय
नम्रपणे बघ्याची भूमिका बजावतात, असा आरोपी तेथील
स्थानिकांनी केला आहे, तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित
राखण्याची जबाबदारी वारजे पोलीस विसरत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
येथे वारजे पोलिसांनी दामिनी पथक कायम उपस्थित
करावे, तसेच रात्री गस्तिपथके वाढवावी. मद्यपींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा,
अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84