दि. 0५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): राजकीय पुढाऱ्यांच्या ताब्यातील समाजमंदिरे महापालिकेने सील केल्याचा फटका झोपडपट्टीतील सुमारे ३० अंगणवाड्यांना बसला असून, त्या बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद झाले. पण ही अडचण समोर आल्यानंतर या अंगणवाड्या पुन्हा सुरू केल्या जातील असे महापालिकेने एकात्मिक बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे.
महापालिकेच्या निधीतून
झोपडपट्टीतील नागरिकांसाठी समाजमंदिरे बांधण्यात आली आहेत. पण या समाजमंदिर
वर्षानुवर्षे स्थानिक पुढाऱ्यांच्या हातात आहे. त्यातून ते उत्पन्न मिळवत असले तरी
त्यातून महापालिकेचा काहीच फायदा होत नाही. उलट पाणी, वीज, देखभाल
दुरुस्ती याचा खर्च करावा लागत आहे. महापालिकेने १३१ समाजमंदिरे पुन्हा ताब्यात
घेण्याची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. त्यामध्ये १३१
समाजमंदिरांपैकी ९८ जागा या पुढाऱ्यांच्या मंडळांच्या ताब्यात आहेत, त्यांना नोटीस देऊन ५८ समाज मंदिर सील केले आहेत. यापैकी
सुमारे ३० ठिकाणी अंगणवाडी भरत असल्याचे समोर आहे. यासाठी मंडळांकडून भाडे ही
घेतले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेने समाज मंदिर बंद
केल्याने एकात्मिक बाल विकास विभागाने महापालिकेशी संपर्क साधला. काही माजी
नगरसेवकांनीही याबाबत तक्रार करून झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद झाले
आहे हे महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आता ही समाज मंदिरे
थेट एकात्मिक बाल विकास विभागाला देण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे.
अतिरिक्त आयुक्त विलास कानडे म्हणाले, ‘‘महापालिकेने समाज मंदिरे सील केले असता त्यातील काही
ठिकाणी अंगणवाडी,
बालवाडी बंद झाली
असल्याची तक्रार आली. यासंदर्भात एकात्मिक बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना
महापालिकेला पत्र देण्यास सांगितले आहे. त्यांचे पत्र आल्यानंतर त्यांना समाजमंदिर
दिले जाईल. ही समाज मंदिर मंडळांच्या ताब्यात असल्याने तेथे बालवाडी भरत असल्याची
आम्हाला कल्पना नव्हती.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84