पुणे,दि.२८ जुलै (चेकमेट टाईम्स) :
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी नुकतीच जाहिर झाली आहे या नुकत्याच
जाहीर झालेल्या कार्यकारिणीमध्ये आंबेगाव येथील अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचे
संस्थापक अध्यक्ष अर्जुन पुरस्कार प्राप्त पै.काकासाहेब पवार यांची सरचिटणीस पदी
बिनविरोध निवड झाल्याबद्दल शवशंभू प्रतिष्ठान जांभूळवाडी आणि युवा संवाद सामाजिक
संस्थेकडुन सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची झालेली निवड
ही बिनविरोध झाली.यामध्ये,विदर्भाचे रामदास तडस यांची निवड
झाली आहे.
विदर्भाला अध्यक्ष पद, मराठवाड्याला सरचिटणीस तर पश्चिम
महाराष्ट्राला वरिष्ठ उपाध्यक्ष पद या निवडीमध्ये देण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित
कार्यकारिणीतील सदस्यांनी एकोप्याने काम करण्याचे ठरविले आहे.तर महाराष्ट्राला
मागील काही दिवसांपासून पैलवानकीला गळती लागली होती ती कुठेतरी पूर्ण करण्याचे काम
आम्ही सगळे करणार आहोत. तर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुस्तीगीर
परिषदेवर असताना चांगली कामगिरी केली होती. बऱ्याच पैलवानांना मोठी मदतही पवार
साहेबांनी केली होती.त्यांनी आमच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. जागतिक
कुस्तीसाठी पैलवान तयार होतील असे प्रयत्न आम्ही करणार आहोत.अशी माहिती पै.
काकासाहेब पवार यांनी सकाळशी बोलताना दिली.
यावेळी, शवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक
अध्यक्ष नितिन जांभळे पाटील, युवा संवाद सामाजिक संस्थेचे
अध्यक्ष धनराज गरड,पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे सरचिटणीस
राहुल बेलदरे पाटील,दीपयंती चिकणे, संजय पिरंगुटे,पत्रकार जयदीप
निंबाळकर आदी मान्यवरांसह दक्षिण पुणे परिसरातील नागरिक उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84