Type Here to Get Search Results !

विजेची तार रिक्षावर पडली, 5 महिला मजूरांचा होरपळून मृत्यू

 


दि.01  जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स )आंध्र प्रदेशमधील श्री साथ्या साई जिल्ह्यात चिल्लाकोंडायपाल्ली गावात एका रिक्षावर विजेची तार पडली. हायव्हॉल्टेज तारेमुळे रिक्षाने लगेच पेट घेतला. या दुर्घटनेत रिक्षातील पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला. रिक्षा चालक मात्र सुदैवाने वाचला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व महिला शेतमजूर होत्या. त्या गुंडामपल्ली येथील चिलाकोंडायपल्ली येथील लिंबाच्या शेतात काम करायला जात होत्या. सकाळी साडे सातच्या सुमारास त्यांची रिक्षा धर्मावरम भागातून जात असताना रिक्षावर हायव्हॉल्टेज तार कोसळली. रिक्षाने तत्काळ पेट घेतला. या रिक्षातील पाचही मजूर महिलांचा होरपळून मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.