पुणे
दि.१४ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : यश हे नेहमीच
प्रयत्नांना चिकटलेले असतात. साथ हवी ती योग्य मार्गदर्शनाचीच ! या उक्तीला साजेशा
कार्यक्रमाचे आयोजन कर्वेनगर भागात नुकतेच करण्यात आले होते. ओंकार चॅरिटेबल
ट्रस्टच्या माध्यमातून सुप्रसिद्ध उद्योजक रामदास माने, सुप्रसिद्ध कवी संदीप खरे आणि संगीतकार सलील कुलकर्णी इत्यादी
मान्यवरांनी इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत,
त्यांना करिअर मार्गदर्शन केले.
कर्वेनगर मधील मारुती भैरवनाथ मंदिर हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या
कार्यक्रमाचे पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील
दुधाने यांनी आयोजन केले होते. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थांना ट्रस्टतर्फे
स्कूल बॅग देवून गौरवण्यात आले. तर दहावी आणि बारावीच्या प्रत्येकी सहा-सहा
विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच ओंकार
चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत मोठे यश प्राप्त
करणाऱ्या वडार वस्ती, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर कॅनॉल रस्त्याच्या खालील गल्ल्यांमध्ये राहणाऱ्या
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून आर्थिक स्वरूपाची देणगी,
शिष्यवृत्ती स्वरूपात प्रत्यक्ष जागेवर देण्यात आली. यामध्ये
दहावीचे दोन आणि बारावीच्या दोन
विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला कर्वेनगर वारजे परिसरातील इयत्ता दहावी व बारावी चे सर्व
गुणवंत विद्यार्थी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता. सुप्रसिद्ध
उद्योजक रामदास माने यांनी त्यांच्या उद्योगातील सुरवात आणि आता प्राप्त झालेल्या
यशाचे गमक विद्यार्थ्यांना सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही
हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे विद्यार्थ्यांनी
सांगितले. तर सुप्रसिद्ध कवी संदीप खरे आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी शिक्षण, शिक्षणातून साहित्य आणि कविता याचा सुरेल संगम साधत केलेली
सांगीतिक वाटचाल उलगडून सांगितल्याने भविष्यात हॉल मध्ये उपस्थित असलेल्या
विद्यार्थ्यांपैकी कोणी मोठे उद्योजक आणि कवी, संगीतकार,
गायक निर्माण झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
उत्कृष्ठ कामगिरी बजावलेले दहावीचे विशेष सत्कारार्थी विद्यार्थी
ऋचा आमित तुळजापूरकर - 96.20%
साक्षी संतोष मारणे - 96%
मयुरी मारुती गायकवाड - 95%
श्रेया तुषार उन्हाळे - 95%
उत्कृष्ठ कामगिरी बजावलेले बारावीचे विशेष सत्कारार्थी विद्यार्थी
अथर्व रोहिदास नांगरे शास्त्र शाखा - 89.83%
गौरी अभिजीत बंडेवार शास्त्र शाखा - 89% -
अनुष्का किशोर तावरे वाणिज्य शाखा - 91.67%
वैष्णवी विजय पवार कला शाखा - 89.33%
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84