पुणे, दि.१८ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): कोणतेही नियोजन अथवा
परिस्थितीचा आढावा न घेता पालिकेच्या पथ विभागाने किरकटवाडी येथील माळवाडी जवळील
ओढ्यावर तयार केलेला पूल वाहून गेल्याने पुर्ण खर्च पाण्यात गेल्याचे चित्र सध्या
दिसत आहे. अगोदर किमान पाण्यातून ये-जा करता येत होती तिही आता अशक्य झाल्याने या
रस्त्यावर अवलंबून असलेले नागरिक पालिकेच्या अशा भोंगळ कारभाराबाबत तीव्र शब्दांत
संताप व्यक्त करत आहेत.
किरकटवाडी येथील माळवाडी जवळून वाहणाऱ्या ओढ्याला पावसाळ्यात
अनेक वेळा पूर येतो. नांदोशी, सणसनगर,वांजळवाडी व किरकटवाडीच्या मोठ्या क्षेत्रावरील पाणी एकत्रित होऊन या
ओढ्यातून वाहत असल्याने प्रवाहाला दाब असतो. काही दिवसांपूर्वी पालिकेच्या पथ
विभागाने सिमेंट पाईप व मुरुम टाकून अत्यंत कमी उंचीचा कच्चा पूल या ओढ्यावर तयार
केला होता. त्यावेळी अनेक नागरिकांनी पालिकेकडून नियोजन न करता विनाकारण होत
असलेल्या पैशांच्या उधळपट्टीबाबत संताप व्यक्त केला होता व पूल वाहून गेल्यावर
चालता येणार नाही अशी भिती व्यक्त केली होती.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल वाहून
गेला असून केवळ सिमेंट पाईप शिल्लक राहिले आहेत. परिणामी आता वाहनांची ये-जा पुर्ण
बंद झाली असून नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. नागरिकांनी याबाबत तक्रारी
केल्यानंतर पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता रमेश पाटोळे व विठ्ठल चंदनशिवे यांनी
पुलाची पाहणी केली असून लवकरच दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले
आहे.
"कोणतेही नियोजन न करता व स्थानिकांशी चर्चा न करता पथ विभागाने निकृष्ट
काम करुन हा पूल तयार केला होता. पुल वाहून गेल्याने नागरिकांची खुप गैरसोय होत
आहे. महिलांना तर चालताही येत नाही. तातडीने दुरुस्ती करण्यात यावी व मजबूत पूल
उभारण्यात यावा."
"नागरिकांच्या तक्रारीनंतर तात्काळ पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहणी करण्यासाठी पाठविले होते. दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने कोणी काम केले त्याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल. सदर ठिकाणी गरजेप्रमाणे योग्य पूल उभारण्यासाठी मुख्य अभियंत्यांकडे शिफारस करण्यात येईल.""जेव्हा काम सुरू होते तेव्हाच आम्ही सांगत होतो की खर्च वाया जाणार आहे परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऐकले नाही. थातूरमातूर काम करुन ठेकेदार निघून गेला. आता धड चालताही येत नाही. नागरिकांचे हाल व्हावे यासाठी मुद्दाम पूल करण्यात आला होता की काय अशी शंका निर्माण झाली आहे."
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84