Type Here to Get Search Results !

अंधेरीतील चित्रकूट स्टुडिओला भीषण आग, एकाचा मृत्यू


 

पुणे, दि.३० जुलै (चेकमेट टाईम्स):  रणबीर कपूर आणि चित्रपट निर्माते लव रंजन यांच्या अद्याप शीर्षक नसलेल्या चित्रपटाच्या सेटवर शुक्रवारी दुपारी आग लागली.  चित्रपटाचा हा सेट मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात लावण्यात आला होता. या आगीत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती कूपर रुग्णालयाचे डॉक्टर सदाफुले यांनी दिली. अंधेरी पश्चिम येथील चित्रकूट स्टुडिओमध्ये सायंकाळी साडेचार वाजता ही आग लागली. रणबीर आणि श्रद्धा लवकरच चित्रपटाचे शूटिंग करणार होते. पण लेव्हल-२ च्या आगीमुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

मुंबई अग्निशमन दलाने सांगितले की, २९ जुलै रोजी रात्री १०.३५ पर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. स्टुडिओला लागलेल्या आगीचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओ आणि चित्रांमध्ये आकाशात भीषण आग आणि काळा धूर दिसत होता. व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाच्या गाड्यांचा आवाजही ऐकू येत आहे.

याआधी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, परिसरातील एका दुकानात आग लागली होती. पण नंतर त्यांनी सांगितले की, आग एका चित्रपटाच्या सेटवर लागली, असे वृत्त एका इंग्रजी वेबसाईटने दिले होते. घटनास्थळावरून काळ्या धुराचे लोट उठताना दिसत होते. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी रात्री उशिरा आग आटोक्यात आणली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.