Type Here to Get Search Results !

बेकायदा फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आम आदमी पार्टीची मागणी

 


दि. 0 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर व चौकात बेकायदा जाहिरात फलक लावल्याचे दिसून येते. महापालिका मात्र त्याच्यावर कारवाई करताना दिसून येत नाही किंवा कारवाई केली तर ती काही ठराविक लोकांवर केली जाते आणि अनेक लोकांना झुकते माप दिले जाते. अशा बेकायदा जाहिरात फलकामुळे शहर विद्रूप होते आणि पालिकेचे उत्पन्नही बुडते. तरीही पालिकेचे अनेक कर्मचारी आणि अधिकारी बेकायदा जाहिरात फलकांकडे दुर्लक्ष करतात. अर्थात असे दुर्लक्ष करण्याचीही किंमत पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी वसूल करत असावेत. विशेषत: पालिकेचे अधिकारी काही राजकीय पक्षांच्या जाहीरात फलकांवर कारवाई करताना पक्षपात करतात. त्यामुळेच अशा फलकांवर कारवाई होत नाही. बेकायदा फलकांसंदर्भात माननीय उच्च न्यायालयाने अनेकदा सर्व महापालिकांना ताकीद दिली आहे. तसेच असे फलक काढून टाकण्याचे आणि ते लावणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदा फलकावर कारवाई न करणे हा न्यायालयीन आदेशाचा अवमान आहे.

मा. उच्च न्यायालयाने अनेक जनहित याचिकांवर निर्णय देताना पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.

1.बेकायदा जाहिरात फलकांमुळे 'स्वच्छ, सुंदर परिसर आणि वातावरण' ह्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते.

2.सर्व बेकायदा फलक, प्लेक्स, जाहिराती इ. त्वरीत काढून टाकाव्यात आणि संबंधीत  व्यक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी.

3.बरेचसे फलक हे राजकीय कार्यकर्त्यांचे असतात. त्यांच्या नेत्यांची त्यांच्यावर मेहेरनजर व्हावी म्हणून असे फलक लावलेले असतात, सबब अश्या कार्यकर्त्यांविरुद्धच बेकायदेशीर फलक उभारले म्हणून कारवाई करावी.

4.बेकायदा फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतेच पण खूपवेळा वाहतुकीचे सिग्नल्स देखील अडले जातात आणि  त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो.

5.बेकायदा फलकामुळे महानगरपालिकांचे आर्थिक नुकसान देखील होते आणि म्हणून असे फलक उभारणाऱ्यांकडूनच दंडाची  तसेच फलक उतरवण्याच्या खर्चाची वसुली करावी.

6.महानगरपालिकांनी बेकायदा फलकांवर कारवाई करण्यासाठी पुरेश्या भरारी पथकांची उभारणी करावी.

या आदेशांची पुण्यात अंमलबजावणी होताना दिसत नाही. म्हणून आम्ही पुणे महापालिका हद्दीतील अनेक बेकायदा फलकांचे फोटो आपल्याकडे पाठवत आहोत. या सर्वांवर महापालिकेने कायदेशीर कारवाई केली पाहिजे. या सर्व फलकांचे मालक किंवा ते उभारणारे यांच्यावर एक आठवड्याच्या आत कारवाई करून संबधितांवर गुन्हे दाखल न केल्यास नाईलाजाने आम्हाला पुढील कायदेशीर पावले उचलावी लागतील आणि त्याची जबाबदारी संपूर्णपणे आपल्यावर राहील याची नोंद घ्यावी.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.