पुणे दि.१४ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : मागील काही वर्षातील वाढत्या महागाईचे अक्राळ-विक्राळ रूप बघून सर्वसामान्य जनता आज हवालदिल झाली आहे. "बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार" हे ब्रीदवाक्य घेऊन २०१४ साली सत्तेवर आलेले मोदी सरकार गेल्या ८ वर्षांत विकासाच्या गाडीला ब्रेक लावून महागाईची एक्सप्रेस मात्र सुसाट वेगाने पळवत आहे.
या बेभान सुटलेल्या महागाईच्या राक्षसाचा निषेध
म्हणून आम आदमी पार्टी (आप) ने सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून
या प्रचंड भाववाढीचा कडाडून विरोध केला आजच्या अंत्ययात्रा द्वारे. ही गॅस सिलिंडर
व विजेची अंत्ययात्रा मोलेदिना रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
पुतळ्यापासून ते, संविधानिक पद्धतीने व सर्व नियमांचे पालनकरित, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आली. या यात्रेत महागाई व
भ्रष्टाचाराचा राक्षस, यम यांच्यासोबत 'आप'च्या कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
आप महाराष्ट्र राज्य संघटक व पुणे शहर
कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी सांगितले की, "गेल्या वर्षभरात
सर्वसामान्य व्यक्तीच्या रोजच्या जीवनातील प्रत्येक वस्तूचे भाव आज आकाशाला भिडले
आहेत. घरघुती वापराच्या सिलेंडरच्या किंमतीने रु. १००० चा टप्पा ओलांडला आहे.
वर्षभरात सिलेंडर दरात तब्बल रु. २५० पेक्षा अधिक दरवाढ करण्यात आली आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर तर सातत्याने वाढविण्यात येत आहेत. क्वचितच अपवाद म्हणून २०
रुपयांनी वाढवलेले दर तोंडदेखले म्हणून ५-१० रुपयांनी कमी केले जातात, हे जनतेला समजत नाही असे भाजपाच्या केंद्र सरकारने समजू
नये."
आधीच गॅस सिलिंडर व इंधन दर वाढीने सामान्य
नागरिकांचे जगणे कठीण झालेले होते. आतातर, महाराष्ट्रात होवू घातलेल्या वीज दरवाढीच्या 'शाॅक'ने आणि केंद्र
सरकारच्या नवीन जी.एस.टी. धोरणानुसार जीवनावश्यक वस्तूंवर लादलेल्या कराने, महागाईच्या या आगीत पेट्रोल ओतले गेले आहे. आप पुणे या विध्वंसक
महागाईचा, आजच्या या आंदोलनाद्वारे, तीव्र निषेध करीत आहे.
माजी न्यायाधीश मंजूषा नयन म्हणाल्या, "दिल्ली व पंजाब येथील 'आप'च्या सरकारने सामान्य जनतेच्या हितासाठी मोफत वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधा सामान्य जनतेला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच प्रकारच्या सुविधा महाराष्ट्रातील सामान्य जनतेला ही मिळाव्यात यासाठी 'आप' प्रयत्नशील आहे व राहील." 'रयतेचे राज्य रयते साठी' या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचा विसर न पडू देता सर्वसामान्य जनतेनी या सरकारची जनविरोधी आर्थिक धोरणे, बेरोजगारी, महागाई या विरोधात 'आप' सोबत मजबुती ने उभे राहावे.
"नुकतेच महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या
शिंदे-फडणवीस सरकारने देखील सत्तेवर येताच राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा शॉक दिला
आहे. बेगडी राष्ट्रवादाचा आणि धार्मिक उन्मादाचा रंग लावून सरकार सर्वसामान्य
जनतेला मूळ मुद्द्या पासून भरकटवू पाहत आहे",
असे म्हणाले
आप पुणे शहर संघटक एकनाथ ढोले. आप पुणेचे श्रीकांत आचार्य, डॉ अभिजीत मोरे, सुदर्शन जगदाळे, विद्यानंद नायक, फेबियन आण्णा सॅमसन, सीमा गुट्टे, निरंजन अडागळे, अंजली लोखंडे, सुनंदा जाधव, किरण कांबळे, किरण कद्रे, आनंद अंकुश, गणेश ढमाले व इतर कार्यकर्त्यांनी भर पावसाची तमा न बाळगता
मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला..
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84