Type Here to Get Search Results !

सामूहिक बलात्कार प्रकरणातील माजी आमदार पुत्राला पुण्यात ठोकल्या बेड्या; वर्षभरापासून होता फरार

 


पुणेदि. जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): उत्तरप्रदेशातील भादोई येथील समाजवादी पक्षाचे माजी आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णू मिश्रा (वय ३४) याला सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात​​​​​ रविवारी रात्री त्यास अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांनी दिली. पुण्यात हडपसर परिसरात ऑक्सिजन विला या अलिशान इमारतीत भाड्यातून घर घेऊन राहत होता. मागील वर्षापासून तो फरार होता. उत्तरप्रदेश पाेलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते, परंतु त्याचा ठावठिकाणा मिळून येत नव्हता.

विष्णु मिश्रा याचे वडील विजय मिश्रा हे उत्तरप्रदेश मधील भदोईचे मोठे प्रस्थ असून ते ४० वर्ष आमदार होते. रविवारीच विजय मिश्रा यांची मुलगी रामी पांडे हिने उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून भाऊ विष्णु मिश्रा याच्या जिवाला धोका असून उत्तरप्रदेश पोलीस त्याचे एनकाऊंटर करु शकतात असे सांगितले होते.

संशयित विष्णू मिश्रा हा सामूहिक बलात्काराच्या गंभीर गुन्हयात आरोपी आहे. मात्र, त्याची पार्श्वभूमी मोठी असल्याने तो मागील दहा महिन्यापासून सापडत नव्हता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवरही शंका उपस्थित होऊ लागल्या होत्या. उत्तरप्रदेश पोलिसांचे एसटीएफ पथक त्याचा कसून शोध घेत होते अखेर तो गळाला लागलाच.

तपासादरम्यान, मिश्रा याचे एक नातेवाईक पुण्यात राहत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली, त्यांच्या मदतीने संशयित आरोपी पुण्यात वास्तव्य करत असल्याचे समजल्याने दहा दिवसांपूर्वीच उत्तरप्रदेश पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले. संशयिताचा पोलिस शोध घेत होते. हडपसर पोलिसांनी उत्तरप्रदेश पोलिसांसोबत संशयित आरोपींचा शोध घेत त्यास जेरबंद केले. सोमवारी त्याला कॅम्प परिसरातील लष्कर न्यायालयात हजर करुन ट्रान्झिट रिमांड घेऊन उत्तरप्रदेश पोलीस त्याला पुढील तपासालाठी घेऊन जाणार आहेत.

संशयित विष्णु मिश्रा याच्यावर गोपीगंज पोलीस स्टेशन, भदोई, उत्तरप्रदेश याठिकाणी आयपीसी ३२३, ५०४, ४४९, ३४७, ३८७,४१९, ४२०, ४६७, ६८, ४७१, ४७४, १२० ब, ३७९, ३७६, ३४२ व ५०६ नुसार गुन्हा दाखल आहे. विष्णु मिश्रा यास सदर गुन्ह्यात फरार घोषित करुन अपर पोलीस महानिदेशक वाराणसी यांनी त्याच्याबाबत माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पाे.काॅ.निखील पवार, पाे.काॅ. भगवान हंबर्डे, पाे.काॅ.एस.साेनवणे यांच्यासह उत्तरप्रदेश मधील वाराणसी एसटीएफचे पथकातील एसीपी शैलेश सिंग, पाेलीस निरीक्षक श्रीवास्तव, पोलीस उपनिरीक्षक अंगत यादव, हवालदार राहुल सिंग यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.