Type Here to Get Search Results !

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! पाण्याची चिंता मिटणार.

 


दि. 0 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली असून पुढील पाच दिवस घाटमाथ्यावर मुसळधारांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या शहरात पाणीकपातीला सोमवारपासूनच सुरुवात करण्यात आली आहे. रविवारच्या तुलनेत चारही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर धरणांच्या क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याची बाब समाधानकारक आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये २.७४ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९.४१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी ४ जुलैपर्यंत चारही धरणांमध्ये ८.६८ टीएमसी म्हणजेच २९.७६ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये ५.९४ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून या चार धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस झालेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असून दोन दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस हजेरी लावत आहे. सोमवारी सकाळी टेमघर धरण परिसरात ३५ मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या क्षेत्रात १८ मि.मी. पानशेत धरण परिसरात १९ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात चार मि.मी. पावसाची नोंद झाली. दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात चार मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात अनुक्रमे सात आणि सहा मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात दोन मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणी होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारच्या तुलनेत चारही धरणांमध्ये ०.१४ टीएमसी म्हणजेच ०.५० टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, धरणांमधील पाण्याने तळ गाठल्याने पुणे महानगरपालिकेकडून सोमवारपासून पाणीकपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही पाणीकपात ११ जुलैपर्यंत सात दिवस करण्यात आली आहे. या कालावधीत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाचे प्रमाण, धरणांमध्ये जमा होणारा पाणीसाठा, हवामान विभागाचे अंदाज यांचा विचार करून पुढील आठवड्यात पाणीकपात सुरूच ठेवायची किंवा कसे?, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या धरणांमध्ये संततधार पाऊस पडत असून पुढील पाच दिवसांत मुसळधारांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.