पुणे, दि.१६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): करोना काळात बंद झालेल्या विमानसेवा पून्हा गतीमान होत आहेत. येत्या २२ जुलैपासून नाशिक-हैदराबाद, तर ४ ऑगस्टपासून नाशिक- दिल्ली विमानसेवा सुरु होणार असून बुकिंग सुरु करण्यात आले आहे. यासोबतच 'स्पाइसजेट'कडून हैद्राबाद सेवेसोबतच आता तिरुपती व पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग फ्लाइट उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे दक्षिण भारतात जाणाऱ्या पर्यटकांची सोय होणार आहे.
नाशिकहुन
सध्या अलायन्स एअरद्वारे अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, नवी दिल्ली व बेळगाव या शहरांसाठी विमानसेवा
उपलब्ध आहे. 'स्पाइसजेट'कडून २२ जुलैपासून हैदराबादसाठी व ४ ऑगस्टपासून नवी दिल्लीसाठी
सेवा सुरू होत आहे.
नाशिक - हैदराबाद सेवेचा आयटी, उद्योग
क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे, तर तिरुपती व पुद्दुचेरी
कनेक्टिव्हिटीचा भाविक, पर्यटकांना लाभ होणार आहे.
तसेच नाशिक हैदराबाद ही सेवा दुहेरी असून, त्यामुळे दक्षिण भारतातून
शिर्डी, त्र्यंबकेश्वरला भाविकांची
आवक वाढण्याचीही शक्यता आहे.
नाशिक- हैदराबादला तिरुपती व
पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. नाशिकहून सकाळी ८.१० वाजता उड्डाण घेणारे विमान ९.४० वाजता हैदराबादला पोहोचणार तर
आहे. तेथून दुपारी १२.५५ वाजता
तिरुपतीसाठी कनेक्टिंग फ्लाइट असून, ती
दुपारी २.०५ वाजता
तेथे पोहोचेल. तर दुपारी ११.५० वाजता
पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग फ्लाइट असून, तो
दुपारी १.३० वाजता
तेथे पोहोचेल. तूर्त ही सेवा एकेरी असली, तरी
लवकरच ती दुहेरी सुरू होण्याची शक्यता आहे.
'स्पाइसजेट'कडून येत्या काळात आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात येणारआहे. सद्या नाशिक हैद्राबाद सेवा शनिवार वगळता आठवड्याच्या ६ दिवस राहणार आहे. तर नाशिक दिल्ली सेवा दररोज राहणार आहे. येत्या 4 ऑगस्टपासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू होत आहे. नवी दिल्लीहून ११ वाजून ५५ मिनिटांनी नाशिककडे विमान उड्डाण घेणार असून, दुपारी २ वाजून २५मिनिटांनी पुन्हा रवाना होणार आहे. ते तेथे ४ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल.पर्यटनाला यामुळे बुस्ट मिळणार असल्याचे आयमा एव्हिएशन कमिटीचे प्रमुख मनीष रावल यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84