Type Here to Get Search Results !

पालकमंत्री पाहिजेत ! पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

 


पुणेदि.२६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): राज्यात महिन्याच्या सुरुवातीला नवीन सरकार स्थापन झालं. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन २५ दिवस झाले असून अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे राज्याचा गाडा सध्या फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच हाकत असल्याचं चित्र असून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन सरकारला डिवचणारं आंदोलन करण्यात आलं असून पुणेकरांना कोणी पालकमंत्री देता अशा घोषणा दिल्या.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनमध्ये शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थितीत होते. २३ दिवसांत ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून ED सरकार तुमचे राजकारण थांबवा असे म्हणत आंदोलनात घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहराच्या वतीने राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारच्या गलथान कारभाराविरोधातही घोषणाबाजी करण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँघ्रेसच्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.