पुणे, दि.२७ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): राज्यात सध्या खरी शिवसेना कोणाची यावरुन शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये संघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात अनपेक्षितपणे सत्तांतर झालं असून यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून बंडखोरांवर जोरदार टीका केली जात आहे. बंडखोर आमदारांकडूनही या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे.
एकनाथ शिंदे
यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या
शुभेच्छा देतानाही त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता
माजी मुख्यमंत्री केला आहे. एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना
शिवसेनेचे पक्षप्रमुख मानण्यासही नकार दिल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
“महाराष्ट्राचे
माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना,” असं एकनाथ शिंदे
यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे
म्हणाले, “त्यांना आणखी काही बोलायचं आहे ते बोलून होऊ द्या. पूर्ण बोलून झालं की मग
मी एकत्रित त्यावर बोलन. त्यांना वाटतं आम्ही पालापाचोळा आहे, पण या
पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे. हे जनतेला माहिती आहे. इतिहास घडवणारे कोण
असतात हे लोकांनी पाहिलं आहे.”
“आमची लढाई सत्तेसाठी नाही. आमची लढाई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या
विचारांसाठी होती. त्यातूनच आम्ही ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे पालापाचोळा, पानगळ जे म्हणायचं
आहे तो त्यांचा अधिकार आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84